Online Admission
Online Admission 
मुंबई

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ?

सकाळवृत्तसेवा
मुंबई - आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा भरण्यासाठी संस्था स्तरावर प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशांसाठी बुधवारी (ता. 31) अखेरचा दिवस आहे; मात्र आयुष मंत्रालयाने प्रवेशप्रक्रियेला 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने नव्याने मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयांतील जागा आणि रिक्त जागांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे.
राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे राबवली जाते. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागा भरण्यासाठी संस्था स्तरावर प्रवेश देण्याची प्रक्रिया 27 ऑक्‍टोबरपासून सुरू झाली आहे. त्याच्या पहिल्या प्रवेश फेरीतील रिक्त जागांवर महाविद्यालयांना 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली आहे. "नीट 2018' परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता आले नाही, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयुष मंत्रालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नव्याने मंजुरी मिळालेल्या महाविद्यालयांतील जागा, रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी आणखी एक फेरी घेण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकांनी याबाबतचा प्रस्ताव सीईटी कक्षाकडे पाठवल्यानंतर प्रवेशप्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येईल.
- ए. ई. रायते, आयुक्त, सीईटी कक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT