मुंबई - देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिल्यास महाराष्ट्र राज्यात त्याचा प्रार्दुभाव झाल्याचा दिसतोय. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही वाढतोय. त्यातच आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपायला केवळ चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर सरकार काय उपाययोजना करणार यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीमधील मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित आहेत.
या बैठकीत मुंबई, मुंबई MMR, पुणे, पुणे MMR या क्षेत्रात ज्या पद्धतीनं रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय त्यावर चर्चा केली जाईल. तसंच चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर कशा पद्धतीनं नवी नियमावली तयार करता येईल. याव्यतिरिक्त काही नियमांत बदल करुन कशापद्धतीनं नवे नियम असतील. यावर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. तसंच या बैठकीत राज्यातला कोरोना संदर्भातला सर्व जिल्ह्यांमधला आढावा घेतला जाईल.
बातमी अपडेट होत आहे...
meeting between maharashtra cabinet ministers starts decision might be taken about lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.