mega block at central railway on sunday makar sankranti festival buying  sakal
मुंबई

Mega Block : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल!

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतल्याने मकर संक्रांतीच्या सणानिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे रविवारी प्रचंड हाल झाले आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन दोन्ही हार्बर मार्गावर ब्लॉक असल्याने मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात आली.त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन वळविण्यात आली होती.

यामुळे धिम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक देखील कोलमडले होते. त्यातच रविवार असल्याने लोकलची संख्या कमी होती.यामुळे प्रवाशांना लोकल गर्दीतून प्रवास करावा लागला. तसेच दादर, कुर्ला, घाटकोपर ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दिसून आली आहे.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११ते दुपारी ४ वाजेपर्यत ब्लॉक होता. या दरम्यान पनवेल ते वाशी दरम्यानची सर्व लोकल वाहतूक बंद होती. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल दरम्यानच्या लोकल देखील बंद होत्या. त्यामुळे वाशी ते पनवेल दरम्यानच्या प्रवाशांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला.

मेल-एक्सप्रेस गाड्या फटका

गेल्या काही दिवसांपासून दाट धुक्यामुळे अनेक मेल- एक्सप्रेस गाडयांना फटका बसतो आहे. त्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने त्यांच्या परिणाम थेट उपनगरीय लोकल सेवनावर होताना दिसून येत आहे.

रविवारी पहाटे दाट धुक्यामुळे लांब पल्याच्या मेल -एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळापेक्षाही विलंबाने धावत होत्या.या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अँप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम दिसून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT