Mumbai Mega Block  Sakal
मुंबई

Mumbai Mega Block : मुंबईतील ब्लॉक संपला; प्रवाशांची कोंडी फुटणार

सीएसएमटी स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवल्याने २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालवणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण आणि सीएसएमटी स्थानकाच्या क्रमांक १०, ११ वरील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम वेळेपूर्वीच मध्य रेल्वेने पूर्ण केले. हा तीन दिवसांचा मेगा ब्लॉक संपल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

यामुळे ठाणे स्थानकातील प्रवासी क्षमतेत वाढ झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल, तर सीएसएमटी स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवल्याने २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालवणे रेल्वे प्रशासनाला शक्य होणार आहे. ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच व सहावर दररोज २५० ते ३०० मेल-एक्स्प्रेस थांबतात.

त्यामुळे ठाणे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे ही गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने गेल्या वर्षी अनेक मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना ठाणे स्थानकांच्या फलाट क्रमांक सात व आठवर थांबा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे, तर मध्य रेल्वेने फलाट क्रमांक पाचची रुंदी दोन ते तीन मीटरने वाढवल्याने प्रवासी सामावून घेण्याची क्षमता वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये! पीएम किसानचा 24 वा हप्ता कधी जमा होणार?

Breaking: स्टोक्स-मॅक्युलमची सत्ता संपली! इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी स्टीफन फ्लेमिंगची नियुक्ती, कर्णधारपदी... ; ECB चा मोठा निर्णय

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

Dharavi Redevelopment: मुंबईतील हिरवळीवर पालिकेचा घाला! धारावी पुनर्विकासासाठी ८,००० झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT