मुंबई

Mega Block : आज मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक'

कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सकाळ डिजिटल टीम

आज लोकल मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती तसेच ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पनवेल-वाशी हार्बर मार्गावरतीही मेगाब्लॉक

पनवेल आणि बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत सुटणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणार्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर, नेरुळ - खारकोपर लाईन सेवा उपलब्ध राहतील.

माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन लोकल मार्गावरतीही आज मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्यादरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबवून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

तसेच ठाण्यातून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे त्या अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

Jannat Zubair: धक्कादायक! पनवेलमध्ये जन्नत जुबैर आणि तिचा भाऊ अयान जुबैरवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : चिपळूणमध्ये पर्यावरणासंबंधी तक्रारीसाठी नागरिकांची प्रदूषण कार्यालयात धडक

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT