Mumbai local 
मुंबई

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या; रविवारी अशा प्रकारे असणार 'मेगा ब्लॉक'!

Mumbai Mega Block : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत कामे | मध्य रेल्वेतर्फे मुख्य मार्गावर उद

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुख्य मार्गावर उद्या (ता. ४) रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; तर रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : भायखळा ते माटुंगा, अप-डाऊन जलद मार्ग
कधी : शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते पहाटे ४.४५
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच दादर येथील फलाट क्र. तीनवर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मेल/एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एक्स्प्रेसला दादर स्थानकातील फलाट एकवर दोनदा थांबा देण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे
कुठे : कुर्ला ते वाशी, अप-डाऊन मार्ग
कधी : रविवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT