mumbai mega block sakal
मुंबई

Mega Block : हार्बर मार्गावर आता ४५ दिवस मेगाब्लॉक!

हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक टाकण्यासाठी दररोज मध्यरात्री चार तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक टाकण्यासाठी दररोज मध्यरात्री चार तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक अंदाजे ४५ दिवस चालणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर उशिरा सुटणाऱ्या काही लोकल सेवा वाशी स्थानकांपर्यत चालविण्यात येणार आहे.

ग्रेटर नोएडातील दादरीपासून ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी सर्वत्र रेल्वे मार्गिका टाकण्याचा प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन लिमिटेडने हाती घेतला आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दोन नवीन ट्र्क पनवेल स्टेशन यार्डमधून जाण्याचे नियोजित आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पनवेल ईएमयू उपनगरीय स्टॅबलिंग लाईन्समध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी दररोज चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. या ब्लॉक कालावधीत, सीएसएमटीहून रात्री १२. २८ आणि १२.४० वाजताची सुटणारी शेवटची पनवेल लोकल वाशी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

त्यामुळे सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड दारावे, बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल स्थानकांदरम्यानची सेवा उपलब्ध होणार नाही. याशिवाय, पहाटे ४.०३ वाजता सुटणारी पनवेल-सीएसएमटी अप मार्गावरील लोकल पनवेल ऐवजी वाशी स्थानकातून पहाटे ०४.३३ वाजता निघेल आणि दुसरी पहाटे ४.२७ ची पनवेल-सीएसएमटी लोकल पनवेलऐवजी वाशी स्थानकातून पहाटे ४. ५७ वाजता सुटणार आहे.

याशिवाय, सीएसएमटीहून पनवेलसाठी मध्यरात्री १२.१३ ची सुटणारी शेवटची लोकल आता पनवेलला रात्री १. ३३ वाजता पोहोचेल. पनवेल ते सीएसएमटी पहिली लोकल पहाटे ४. ४९ वाजता सुटून सीएसएमटी येथे सकाळी ६.०८ वाजता पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT