megablock Canceled central and harbour line sakal
मुंबई

मध्य, हार्बरवर मेगाब्लॉक रद्द

पश्‍चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दर रविवारी मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. या वेळी रेल्वेरूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. मात्र, रविवारी, (ता. १) महाराष्ट्र आणि कामगार दिनी मेगाब्लॉकला सुट्टी देण्यात आली आहे. मध्य आणि हार्बरवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक न घेता रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे; तर फक्त पायाभूत कामांसाठी ट्रान्स हार्बरवर ब्लॉक घेतला आहे.

ट्रान्स हार्बर

कुठे : ठाणे ते ऐरोलीदरम्यान

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम : ठाणे ते ऐरोलीदरम्यान मेट्रोसाठी आरएच गर्डर्स टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून वाशी/नेरूळ/पनवेल करीता सुटणारी आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते अंधेरीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी-रविवारच्या मध्यरात्री ११.१५ ते रात्री ३.१५

परिणाम : पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा ब्लॉक नसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Latest Marathi News Live Update: मुंबईत कोणतीही मुलं बेपत्ता झालेली नाहीत, पोलिसांची माहिती

Momos Scam: मोमोजची आवड पडली महागात; कुटुंबाने गमावले तब्बल 85 लाखांचे दागिने

T20 World Cup: पाकिस्तानचा बहिष्कार तरी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार; जाणून घ्या त्यामागचं गणित

SCROLL FOR NEXT