Mega block mumbai on Sunday Sakal
मुंबई

Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २० ऑगस्ट २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २० ऑगस्ट २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहोचेल.

हार्बर मार्गावर -

हार्बर रेल्वे

कुठे - कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर

कधी - सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकता.

पश्चिम रेल्वे -

कुठे - बोरिवली - भाईंदर अप-डाऊन धीम्या, डाऊन जलद मार्गावर

वेळ - रात्री १२.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व गाड्या विरार-वसई रोड ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवसाचा ब्लॉक असणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT