मुंबई

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; विविध यंत्रणांची दुरुस्ती होणार

प्रशांत कांबळे

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर मार्ग आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी रेल्वेरूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती केली जाणार आहे. 

मध्ये रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. 

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. परिणामी सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातून फलाट क्रमांक 8 वरून पनवेलकरिता स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेनलाईनने प्रवास करता येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

पश्‍चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून होणार आहे. 
-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

Pune News: एसटीच्या २५ हजार बस रस्त्यातच बंद; गेल्या चार महिन्यांतील स्थिती, पाच हजार बसची स्थिती अत्यंत खराब

Thane Crime: ठाण्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ, दोन मुलींची सुटका

Maharashtra Drought Relief : दुष्काळ जाहीर; मदतीचे निकष गुलदस्त्यात! कृषी विभागाला आदेशाची प्रतीक्षा ; जुन्या निकषांबाबत संभ्रम

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

SCROLL FOR NEXT