Abhishek Ghosalkar esakal
मुंबई

Mumbai Crime : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मेहुल पारिखच्या अटकेची शक्यता

शिवसेना (उबाठा) नेते तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मॉरीस नोरोन्हा याचा जवळचा सहकारी मेहुल पारिख याला अटक होण्याची दाट शक्यता आहे.

राजू परुळेकर

मुंबई - शिवसेना (उबाठा) नेते तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मॉरीस नोरोन्हा याचा जवळचा सहकारी मेहुल पारिख याला अटक होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मेहुलच्या जबाबातील विसंगती तसेच सीसीटिव्ही फुटेज बघता, या संपुर्ण कटाची माहिती मेहुलला होती. या निष्कर्षाप्रती पोलिस आले आहेत.

गेल्या आठवड्यात दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरीसचा मित्र असलेल्या मेहुल पारीख याला अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा कटाची माहिती होती. मात्र तरीही त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याने काहीच केले नाही. असा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी मेहुलला कोणत्याही क्षणी अटक होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी मॉरीसचा अंगरक्षक अमेंद्रर अशोककुमार मिश्रा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातच मॉरीसचा जवळचा सहकारी मेहुल पारीख याचाही जबाब पोलिसांनी नोंदवला होता. या घटनेच्या वेळेस उपस्थित नव्हता. काही मिनिटापुर्वी त्याच्या आजारी आईला बघायला गेल्याचा दावा मेहुलने केला. मात्र सीसीटिव्ही फुटेजवरुन घटनेच्या वेळी मेहुल तिथे उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. असे पोलिसांनी सांगीतले.

मॉरीसला पाठींबा

हत्येच्या दिवशी मॉरीसची वागणुक संशयास्पद होती.मॉरीस काही तरी करणार आहे याची माहिती मेहुलला होती. अप्रत्यक्ष मॉरीसच्या कृत्याला मेहुलचा पाठींबा होता असा संशय पोलिसांना आहे. गोळीबारानंतर मेहुलने घटनास्थळावरुन पळ काढला, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे.

मेहुल संशयाच्या घेऱ्यात

१. हत्येच्या दिवशी मॉरीसची वागणूक संशयास्पद होती.मात्र मेहुलने त्याला रोखले का नाही?

२. गोळीबारानंतर घटनास्थळावरुन पळून जाण्याचे कारण काय होते

३. गोळीबाराच्या वेळी उपस्थित नसल्याचा मेहुलचा दावा खोटा

४. मॉरीसच्या कृत्याला मेहुलचा पाठींबा होता का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT