Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray: 'लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे विधानसभेला स्वबळावर! किती जागा लढवणार? राज ठाकरेंनी सांगितला आकडा

MNS chief raj Thackeray Melawa: रंग शारदा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेला किती जागा लढवणार याबाबत भाष्य केलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- रंग शारदा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभेला किती जागा लढवणार याबाबत भाष्य केलं आहे. मनसे सव्वादोनशे ते अडीशे जागांवर निवडणुका लढवणार आहोत, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवेल असे स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

काही लोक हसतील. पण हे घडणार म्हणजे घडणार. लोक आपल्यासोबत येतील. युती होईल का आघाडी होईल का असा काही विचार करू नका. २२५ ते २५० जागा आपण लढवणार आहोत, असं राज यांनी स्पष्ट केलं.

सर्वे करणारे लोकांशी बोलत आहेत. काय परिस्थितीत आहे, काय घडू शकते, याचे आकलन केले जात आहे. निवडून येण्याची कपॅसिटी असेल यांना तिकीट देणार आहे. तिकीट मिळाल्यावर मी पैसे काढायला मोकळा अश्या लोकांना तिकीट मिळणार नाही. जे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती नीट द्या. तुमची माहिती चेक होणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मनसेचे लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

रस्त्यावरील खड्डे बुजवायला पैसे नाहीत. मूळ राज्याच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकमेकांवर आरोप करून लोकांना भरकटवायचे काम सुरू आहे. काल मी यादी पाहत होतो विधानसभेची... कोण कुठल्या पक्षात आहे काही कळत नव्हतं. येणाऱ्या निवडणुकीत या पक्षांमध्ये जे घमासान असणार ते ना भूतो असेल, असा अंदाज राज ठाकरेंनी व्यक्त केलाय.

आंपल्या पक्षातील काही लोक इतर पक्षात चालले आहेत. मी स्वतः त्यांना लाल कार्पेट घालतो. ज्यांना जायचे जा . वाटोळं करून घ्या. लोकसभेत कुठे घुसले माहीत आहे ना, असं म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता वसंत मोरे यांच्यावर टीका केली. जिथे पूर, जिथे पाणी साठले आहे तिथे जाऊन मदत करा हे कार्यकर्त्यांना आवाहन आहे, असं देखील ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT