भाजपचे उत्तर भारतीय नेते आर. एन. सिंह कालवश sakal
मुंबई

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आर एन सिंह यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य आणि उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. एन. सिंह (74) यांचे आज गोरखपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे मुले-मुली, नातवंडे असा परिवार आहे.

विशेष म्हणजे सिंह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कालच त्यांनी उत्तर प्रदेशात आपल्या मूळ गावी गरजूंना मोठ्याप्रमाणात सहाय्य केले होते. तेथून ते आज मुंबईला येण्यासाठी निघाले होते. मात्र गोरखपुर विमानतळावर येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 40 ते 50 वर्षापूर्वी मुंबईत आलेल्या सिंह यांनी येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, सभागृह उभारून वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली. उत्तर भारतीयांमधील त्यांच्या लोकप्रियतेत यामुळेच भाजपने त्यांना सन 2016 मध्ये विधान परिषदेवर नियुक्त केले होते. उत्तर प्रदेशातील त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT