File Photo 
मुंबई

रात्री धावून महिलांचा सुरक्षिततेचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र महिलांसाठी रात्रीही सुरक्षित आहे, असा संदेश किमान दीड हजार महिलांनी रात्रीच्या प्रहरी धावून दिला. निमित्त होते येत्या रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे. 
आजवर मुंबई आणि देशभरात अनेक मॅरेथॉन झाल्या आहेत; पण महाराष्ट्र पोलिस स्वतःच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन घेणार आहेत. पोलिसांकडून होणारी ही देशातील पहिली मॅरेथॉन असणार आहे; पण त्याअगोदर शुक्रवारी महिलांनी तीन कि.मी.ची दौड करून नवा इतिहास रचला. रात्रीच्या प्रहरी तेही महिलांनी धावण्याचा प्रसंग देशाच्या मॅरेथॉन इतिहासात प्रथमच घडला. 

महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाचा परिसर शुक्रवारी रात्री महिलांच्या उत्साहाने गजबजला होता. "फ्रिडम फ्रॉम फिअर' या घोषवाक्‍याने पार पडलेल्या या केवळ महिलांच्या मॅरेथॉनमध्ये 10 वर्षांच्या मुलींपासून साठी पार केलेल्या आजीही उत्साहात धावल्या. एक आजी तर साडीमध्ये धावत होत्या. 

कुटुंबही धावले 
महिलांच्या या मॅरेथॉनमध्ये संपूर्ण मुंबईतून महिला आल्या होत्या. त्यात डॉ. तेजस्विनी पवार त्यांची 60 वर्षांची आई संध्या उबाळ आणि 68 वर्षांच्या सासू रजनी पवार यांचाही समावेश होता. रजनी पवार तर अशा अनेक मॅरेथॉन धावत असतात. महाराष्ट्र पोलिस मुख्यालय तर एअर इंडिया इमारत असा शर्यतीचा मार्ग होता. रात्री 10.30 वाजता शर्यत सुरू झाली तेव्हा या परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली होती. रस्त्यांवर थांबलेले रात्री महिला शर्यतीत धावत असल्याचे पाहताना शाबासकीही देत होते. 

शर्यतीअगोदर सराव
या शर्यतीत काही महिला पोलिसांचा तसेच पोलिस पत्नींसह काही नवोदितांचाही समावेश होता. शर्यत सुरू होण्यापूर्वी सर्वांकडून वॉर्मअप करून घेण्यात आला होता. ही शर्यतीचे नियोजन "ट्रिगर्समॉम' संघटनेने केले होते. सुवर्णा जोशी यांचा यात मोठा वाटा होता.

The message of security was given by women at night

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१ जुलैपासून पेट्रोल-डिझेल खरेदीच्या नियमात बदल, केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

MD Drugs: पश्चिम महाराष्ट्रात एमडी ड्रग्जसाठी गुंडांची हातमिळवणी! सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तयार झाली अभेद्य साखळी

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

SCROLL FOR NEXT