जुळ्या बोगद्यातून बाहेर आलेले टीबीएम.
जुळ्या बोगद्यातून बाहेर आलेले टीबीएम. 
मुंबई

मेट्रो ३ चे भुयारीकरण दादरपर्यंत पूर्ण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - माहीम येथील नयानगर लाँचिंग शाफ्टमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही टीबीएम बाहेर पडणे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यापूर्वी सीप्झ व आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन ठिकाणी भुयारीकरण (ब्रेक थ्रू) पूर्ण करण्यात आले आहे. आज दादरमधील शिवसेना भवनपर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले.

कृष्णा १ आणि २ या दोन टनेल बोअरिंग मशीन नयानगर लाँचिंग शाफ्टमधून अनुक्रमे २१ सप्टेंबर आणि १८ ऑक्‍टोबर २०१७ रोजी भूगर्भात उतरवण्यात आल्या होत्या. नयानगर माहीमपासून दादर मेट्रो स्थानकापर्यंत अप मार्गावर २४९० मीटर भुयारीकरण करण्यासाठी कृष्णा १ या टीबीएमसाठी १७७९ इतक्‍या आरसीसी सिमेंट रिंग्जचा वापर करण्यात आला. कृष्णा २ या डाऊन मार्गावरील टीबीएमसाठी २४७२ मीटर भुयारीकरणासाठी १७६६ इतक्‍या आरसीसी रिंग्जचा वापर करण्यात आला. कृष्णा १ व २ द्वारे सरासरी दररोज १० ते १२ मीटर भुयारीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण भुयारीकरणात अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि कामगार यांच्या १०० जणांच्या दोन तुकड्यांनी बेसाल्ट, टफ आणि ब्रेशियासारख्या कठीण खडकांना भेदत महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णा १ आणि २ हे हॅरॅन्कनेट या जर्मनी बनावटीचे टीबीएम मशीन आहे व त्याची लांबी १०८ मीटर असून ते प्रत्येकी ४०० टन आहे.

दिलेल्या वेळेत काम पूर्ण
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी भिडे म्हणाल्या, ‘आज प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठला आहे. सध्या सर्व १७ टीबीएम मुंबईच्या भूगर्भात काम करत आहेत आणि १८ कि.मी.पेक्षा अधिक म्हणजेच एकूण ३५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कामाची गती बघता मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी दिलेल्या वेळेत आम्ही मेट्रो- ३ मुंबईकरांच्या सेवेत आणू असा विश्‍वास आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT