Mumbai Metro Sakal
मुंबई

Mumbai Metro : मेट्रो-९ मार्गिका डोंगरीपर्यंत विस्तारणार; तीन स्थानकांची होणार वाढ

मेट्रो-९ मार्गिकेचा विस्तार डोंगरीपर्यंत करण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मेट्रो-९ मार्गिकेचा विस्तार डोंगरीपर्यंत करण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखली आहे. मेट्रो-९ ही ठाण्याला मुंबईशी जोडणारी एक प्रमुख मार्गिका आहे. मार्गिकेच्या विस्तारासोबतच तीन स्थानकांची वाढ होणार आहे. ही मार्गिका ठाणे जिल्ह्यातील डोंगरी येथील नवीन देखभाल डेपोपर्यंत विस्तारित करण्याची योजना एमएमआरडीएची योजना आहे.

मेट्रो-९ मार्गिका अंदाजे ३.७ किलोमीटरने विस्तारली जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकापासून डेपोचे स्थान सुमारे ५.५ किलोमीटर असेल. रायमुर्ढे येथील प्रस्तावित डेपोच्या जागेसाठी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ता. २० एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वॉर रूमच्या बैठकीत रायमुर्ढे येथील प्रस्ताव वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढे हा प्रस्ताव उत्तन (डोंगरी) येथे हलविण्याचे निर्देश देण्यात आले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन एमएमआरडीएकडे सुपूर्द केली. 'एमएमआरडीए'ने या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आणि निविदा तयार करण्याचे काम प्रक्रियेत आहे, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

मुंबई उपनगरांना मीरा-भाईंदर शहराला जोडणारी ८ स्थानके असलेली १०.५८ किमीलांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग-९ चे बांधकाम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. मेट्रो मार्ग-९ हा मेट्रो मार्ग-७ चा उत्तरेकडील विस्तार आहे. ही मार्गिका इतर मेट्रो कॉरिडॉरपेक्षा वेगळी आहे कारण मेट्रो या मेट्रो मर्गिकेमध्ये दोन आंतरबद्दल मेट्रो स्थानकांसोबत आणि रस्ते वाहतुकीसाठी फ्लायओव्हर सुध्दा आहेत.

या प्रस्तावित ३.७ किमी लांबीच्या विस्तारामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकापासून पुढे नवीन तीन नवीन स्थानके असतील. याशिवाय डोंगरी, मीरा भाईंदर, दहिसर पूर्व, गुंदवली आणि सीएसआयए टर्मिनल-२ ला जोडणाऱ्या संपूर्ण रेड लाईनच्या बीएएमएल गाड्या स्थिर आणि देखरेख करण्यासाठी डोंगरी डेपो बांधला जाईल.

डोंगरी डेपो हे ४१.३६ हेक्टर जमिनीवर वसलेले आहे. येथेच डेपो बांधण्याचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएच्या अर्जात ही जमीन सीआरझेडने बाधित नसल्याचे अधोरेखित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT