Mumbai Metro Sakal
मुंबई

Navratri Utsav : नवरात्र उत्सवासाठी मेट्रो सज्ज

नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १९ ते २३ऑक्टोबर या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही रात्री १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसाठी अतिरिक्त सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी लाखो नागरीक घराबाहेर पडतात. या काळात त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त फेऱ्यांचा समावेश असणार आहे.

सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या फेऱ्या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. तसेच शनिवारी २३८ आणि रविवार २०५ इतक्या फेऱ्या ८ ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.

मात्र या अतिरिक्त फेऱ्यांच्या कालावधीत मेट्रो मार्ग २अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री १:३० वाजता पोहचेल. अतिरिक्त सेवांमध्ये कामाच्या दिवशी २६७ सेवा तर सुट्टीच्या दिवशी २५२ सेवा असतील.

नवरात्र उत्सवादरम्यान रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक व्हावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा प्रवाशांना नक्कीच होईल आणि या अतिरिक्त सेवेमुळे मुंबईकरांना नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करता येईल. आत्तापर्यंत पर्यावरणपूरक अशा मेट्रो ने सुमारे ५ कोटी नागरिकांनी प्रवास करून मेट्रोला नागरीकांनी पसंतीस दर्शविली आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायक मेट्रो सेवा प्रदान करत आहोत. मुंबईकर नागरीक मेट्रोला पसंती दर्शवत असून मेट्रो च्या प्रवासी संख्येत दरमहा सरासरी ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात आता अतिरिक्त सेवा सुरू करत असल्याने प्रवासी संख्येत नक्कीच वाढ होईल तसेच नागरीकांना या कालावधीत सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अविरतपणे करता येईल.

- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० वर्षांपूर्वीचे 'ते' पत्र अखेर सापडले, शिक्षकांच्या निवडश्रेणीचा मार्ग मोकळा, पत्रात नेमकं काय लिहिलंय?

लोहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी; केतन अग्रवाल प्रकरणामुळे घटनास्थळ ठरतंय आकर्षण

रेल्वेत 'पहिले या, पहिले निवडा' तत्त्वावर नोकरी मिळणार! मुंबई ते सूरतदरम्यान 175 पदांची भरती होणार; अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Satara farmers: आत्मनिर्भरतेकडे शेतकऱ्यांची मोठी झेप; २५ हजार क्विंटल घरगुती सोयाबीन बियाण्यांची निर्मिती, साताऱ्यात शेतकऱ्यांची नवी क्रांती!

Maharashtra Housing Rules: सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी नवे नियम २०२६ जाहीर; स्वयं-पुनर्विकासासाठी जमिनीच्या १० पट कर्जमर्यादा, थकीत वसुलीसाठी कडक तरतुदी

SCROLL FOR NEXT