Andheri traffic jam sakal media
मुंबई

अंधेरी पूर्वेला दिवसभर वाहतूक कोंडी; रिक्षाडेक मिनीसॅटिस सहावर्षे विनावापर पडून

कृष्ण जोशी

जोगेश्वरी : जोगेश्वरी ते पार्ले या विभागाला मध्यवर्ती असलेल्या तसेच मेट्रो स्थानक (Metro stations) असलेल्या अंधेरी पूर्व परिसरातून विमानतळ, कुर्ला, पवई, ठाणे पर्यंत रिक्षा-बस-वाहनांनी प्रवासी जातात. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी (traffic jam) असते. यातील रिक्षांमुळे (Rikshaw) वाहतूक कोंडी होण्यात निगरगट्ट पश्चिम रेल्वे (western railway) प्रशासनाचा मोठा वाटा आहे. ठाण्याच्या सॅटिसच्या धर्तीवर येथे सहा वर्षांपूर्वी उभारलेला रिक्षा डेक-मिनी सॅटीस सुरु न झाल्याने हजारो प्रवाशांना मोठाच त्रास होतो.

अंधेरी पूर्वेला अनेक कचेऱ्या, सीप्झ, एमआयडीसी, पवईचे आयआयटी-लार्सन टुब्रो आदी कंपन्यांची कार्यालये, शाळा-महाविद्यालये, सेव्हन हिल्स रुग्णालय आदी आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुर्ला-पवई पासून जोगेश्वरी ते पार्ल्याचे हजारो लोक अंधेरी पूर्वेला येतात. रस्त्यावरच बेशिस्तीत उभ्या असलेल्या रिक्षांमुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.

रेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या रस्त्याच्या कडेलाच आगरकर चौक बसस्थानक आहे. या रस्त्यावरच किमान वीस तीस बस चे थांबे असल्याने ती गर्दीही येथे असतेच. बेस्टच्या आगरकर चौक स्थानकाच्‍या बाजूलाच पोलिसचौकी असूनही प्रचंड वाहतूक कोंडी झाली तरच पोलिस रिक्षांना शिस्त लावण्यास पुढे येतात. तेथील बेस्‍टचे निरीक्षक फक्त बस या रिक्षाच्‍या गराडयातून बाहेर कशी पडेल व स्‍थानकात किंवा थांब्यावर कशी येईल यासाठीच शिट्टी वाजवून वाहतूकीचे नियोजन करतात. इतर वेळी पोलिस व बेस्ट निरीक्षक यांना इतर वाहनांशी काही घेणे देणे नसते.

'' येथे वाहतुक पोलिसांची चौकी उभारून रस्‍त्‍याच्‍या एका बाजूला रिक्षाची रांग बनवून एका मागून एक रिक्षा लावून ती सोडयात याव्यात. तसेच येथील शेअरींग रिक्षा तसेच मीटरप्रमाणे चालणार्‍या रिक्षा वेगवेगळया करून त्‍यांना स्टेशन परिसरापासून थोड्या अंतरावर वेगळी जागा देउन नियोजन केल्यास हा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही अंशी तरी मार्गी लागू शकेल '' असे अंधेरी रेल्‍वे पोलिस कर्मचारी संतोष राणे यांनी सांगितले.

रिक्षाडेक-मिनी सॅटिस सहावर्षे विनावापर पडून

या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रेल्वेने सहा वर्षांपूर्वी ठाण्याच्या सॅटिसच्या धर्तीवर अंधेरी पूर्वेला उभारलेले रिक्षाडेक (मिनी सॅटिस) अजूनही सुरु केले नाही. या रिक्षाडेकमुळे रिक्षा वर चढून रेल्वेपुलाच्या पातळीवर येऊन उभ्या राहतील व वृद्ध-अपंग-गर्भवती स्त्रीयाचा रेल्वेपुलाच्या पायऱ्या चढण्याचा त्रास वाचेल. तसेच रस्त्यावरील रिक्षा या डेकवर उभ्या राहिल्याने रस्त्यावरची त्यांची गर्दीही संपेल. सकाळ ने हा प्रश्न सातत्याने लावून धरला असून ती वृत्ते वाचून खासदार गजानन कीर्तीकर, गोपाळ शेट्टी यांनी तेथे पहाणी करून हा रिक्षाडेक सुरु करण्याच्या सूचनाही रेल्वेला दिल्या होत्या. माजी आमदार विद्या चव्हाण यांनी रिक्षाडेक सुरु करण्यासाठी आंदोलनही केले होते. मात्र आधी सुरक्षा व्यवस्था मग अव्यवस्था आता प्रवाशांची गर्दी अशी एकाहून एक तकलादू कारणे देऊन रेल्वेप्रशासन हा रिक्षाडेक सुरु करीत नाही. मग फक्त निविदा काढून खर्च करण्यासाठीच हा रिक्षाडेक बांधला का, असेही प्रवासी विचारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT