Mumbai Metro Rain sakal
मुंबई

Mumbai Metro Rain: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या

Monsoon Special Metro : एकाच दिवसात तब्बल २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai : मेट्रो २ अ किंवा ७ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा मेट्रो प्रवासाकडे कल वाढला आहे. त्याची दखल घेत एमएमआरडीएने सदर मेट्रो मार्गावर आजपासून २४ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दररोज २८२ मेट्रो फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो मार्गावर सध्या गर्दीच्या वेळी दर ७ मिनिटाला एक मेट्रो धावते. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत एमएमआरडीएने आपल्या सेवेत आणखी एक मेट्रो ट्रेन आणली आहे. त्यामुळे दिवसभरात २४ अतिरिक्त फे-या सुरु झाल्या आहेत.

याशिवाय ३ मेट्रो गाड्या राखीव ठेवल्या असल्याने, आपत्कालीन काळात गरजेनुसार मेट्रो सेवेत अधिकची वाढ करता येईल. अलीकडेच मुंबई मेट्रोने प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला होता. एकाच दिवसात तब्बल २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT