मुंबई

चारकोपमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोचे अनावरण

कुलदीप घायवट


मुंबई  : मेट्रो-2 अ आणि 7 या मार्गावरही चालकरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील कोच बेंगळुरु येथून मुंबईत बुधवारी (ता. 27) दाखल झाले. या मेट्रोचा अनावरण समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (ता. 29) दुपारी 3 वाजता चारकोप डेपोमध्ये करण्यात येणार आहे. 

कोरोना नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ब्रॅंडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्‌घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित असणार आहेत. बेंगळुरु येथून शुक्रवारी (ता. 22) मेट्रो मुंबईच्या दिशेने निघाली होती, तर बुधवारी (ता. 27) रात्रीच्या वेळी मेट्रो मुंबईत दाखल झाली.

अनावरण केल्यानंतर पुढील दोन महिन्यांत मेट्रोच्या चाचणी सुरू होतील. मेपासून मेट्रो सेवेत दाखल होईल. मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी आठ कोटी खर्च झाले आहेत. 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. कोचच्या निर्मितीसाठी एकूण 3015 कोटी खर्च येत आहे. एकूण कोचची संख्या 576 पर्यंत वाढणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. 

( संपादन - तुषार सोनवणे )

Metro unveiled by Chief Minister Uddhav Thackeray at Charkop today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT