मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत काढण्याचे सूतोवाच नुकतेच केले होते. त्यानुसार मंडळाने सोडतीची तयारी सुरु केली असून तब्बल 7 हजार 500 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या सोडतीमधील घरे ठाणे, कल्याण परिसरात आहेत.
लॉकडाऊनमुळे कोकण मंडळाची सोडत लांबणीवर गेली होती. ही सोडत काढण्याची तयारी मंडळाने सुरु केली आहे. या सोडतीमध्ये ठाण्यातील भंडारली आणि गोटेघर येथील घरांचा समावेश असणार आहे. तर कल्याणमधील शिरढोण खोणी येथील घरांचा समावेश असेल. मार्च अखेरीस मंडळाकडून सोडतीची प्रक्रिया सुरू होईल. तर मे महिन्यात सोडत काढण्यात येईल, असे कोकण मंडळातील सूत्रांनी सांगितले. ठाणे, कल्याण परिसरातील घरे ही आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच होऊ घातलेली लॉटरी आणि त्यातील घरांचा आढावा घेतला. म्हाडाचा ठाणे, कल्याण, नवी मुंबई भागातील सुमारे 8 हजार घरांची लॉटरी करण्याचा मानस आहे.
या बंपर लॉटरीमध्ये कुठे आणि किती घरं असतील हे खालीलप्रमाणे
ठिकाण | एकूण घरं |
ठाणे, वर्तकनगर | 67 |
ठाणे शहर (विखुरलेली घरं) | 821 |
घणसोली, नवी मुंबई | 40 |
भंडार्ली, ठाणे ग्रामीण | 1771 |
गोठेघर, ठाणे ग्रामीण | 1185 |
खोणी- कल्याण ग्रामीण | 2016 |
वाळीव वसई | 43 |
-----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
mhada draw lottery 7500 houses kokan thane new mumbai
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.