MHADA Mumbai Online Application Process Esakal
मुंबई

MHADA Mumbai Online Application: म्हाडा लॉटरीसाठी शेवटची संधी, उरले फक्त दोन दिवस, जाणून घ्या कसा करायचा ऑनलाइन अर्ज

MHADA Mumbai Online Application Process: घरांच्या किमती जास्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतर म्हाडाने त्यामध्ये सुमारे 10 लाख रुपयांची घटही केली होती.

आशुतोष मसगौंडे

प्रत्येकाला मुंबईत आपलं हक्काचं घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आता म्हाडाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. 2030 घरांच्या या लॉटरीसाठी अर्ज करायला आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. यासाठी 19 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 9 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 9 सप्टेंबर होती. पण म्हाडाने नंतर ती वाढवून 19 सप्टेंबर केली होती.

मुंबई म्हाडाने 2 हजार 30 घरांसाठी 9 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत अर्ज मागविले होते. परंतू इतक्या कमी कालावधीत अर्जदारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हीच बाब लक्षात घेऊन म्हाडाने नंतर ही मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. यासह घरांच्या किमती जास्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतर म्हाडाने त्यामध्ये सुमारे 10 लाख रुपयांची घटही केली होती.

दरम्यान या लॉटरीमध्ये अर्जदारांना म्हाडा पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड यासारख्या भागात 2030 घरे उपलब्ध करून देणार आहे.

कसा करायचा ऑनलाईन अर्ज?

अर्ज भरण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम https://lottery.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर जावे.

  1. "RegRegisteres" बटणावर क्लिक करावे आणि काळजीपूर्वक ऑनलाइन फॉर्म भरावा.

  2. ऑनलाइन अर्जामध्ये, “*” केलेले पर्याय भरणे अनिवार्य आहे.

  3. ऑनलाइन अर्ज भरताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावी.

  4. अर्जदाराच्या छायाचित्राची सॉफ्ट प्रत (5 KB ते 50 KB), कँन्सल चेकची स्कॅन प्रत

  • अर्जदाराचे बँक खाते आणि अर्जदाराच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन प्रत (5 KB ते

  • 300 KB).

  • अर्जदाराचा पॅन कार्ड क्रमांक आणि पॅन कार्डची स्कॅन प्रत (5 KB ते 300 KB).

  • अर्जदाराची जन्मतारीख आणि आधार कार्ड क्रमांक.

  • अर्जदाराचा निवास पत्ता आणि पोस्ट पिन क्रमांक.

  • ३.५) अर्जदाराचा वैयक्तिक संपर्क क्रमांक, निवासी संपर्क क्रमांक, कार्यालयीन संपर्क क्रमांक,

  • ईमेल आयडी इ.

  • अर्जदाराचा बँक खाते क्रमांक आणि संबंधित MICR आणि IFSC कोड.

4. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर, “सबमिट” बटणावर क्लिक करा. तसेच भरलेले सर्व तपशील तपासा

पुन्हा एकदा ऑनलाइन फॉर्म आणि नंतर "कन्फर्म" बटणावर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT