म्हाडा भरतीची परीक्षा रद्द sakal
मुंबई

ऐनवेळी म्हाडा भरतीची परीक्षा रद्द

परीक्षा केंद्रांवर उमेदवारांचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडा भरती परीक्षेचे पेपर लिक प्रकरणी पुण्यात तीन जणांना अटक होताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ऐन मध्यरात्री म्हाडाची परीक्षा रद्द केली. रविवारी (ता.12) सकाळी उमेदवार दूरवरून परीक्षा केंद्रांवर पोचले मात्र केंद्रांवर परीक्षा रद्द झाल्याचे बोर्ड पाहून उमेदवारांनी गोंधळ घातला. परीक्षा रद्द केल्याबाबत म्हाडाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनावर कोणाचीच सही नसल्याने आम्ही विश्वास कसा ठेवायचा असा संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर विचारत गोंधळ घातला.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती. रविवारी (ता.12) सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक विधी सल्लागार या पदांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची परीक्षा होणार होती. या दोन्ही परीक्षेला एक लाख 6 हजार उमेदवार बसणार होते.

ही भरती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत असल्याने अगोदरच विविध चर्चांना उधाण आले होते. यातच परीक्षा घेणारी कंपनी काही काळ ब्लॅक लिस्ट असल्याची माहिती समोर असल्याने या परिक्षेवर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परीक्षेला दोन दिवस शिल्लक असताना गृहनिर्माण मंत्र्यांनी भरतीसाठी काही लोकांनी पैसे घेतले असल्याने प्राथमिक परीक्षेनंतर मुख्य परीक्षा घेण्याचे जाहीर केले. अखेर परीक्षेला काही तास शिल्लक असतानाच गृहनिर्माण मंत्र्यांनी तांत्रिक कारणामुळे परीक्षा केल्याचे जाहीर केले. त्यानुसार म्हाडाने परीक्षा रद्द केल्याचे निवेदन जाहीर केले. परीक्षेसाठी उमेदवार धावपळ करत परीक्षा केंद्रांवर पोचले. सकाळी 10.30 वाजता पहिल्या सत्राची परीक्षा होणार होती. मात्र त्याठिकाणी परीक्षा रद्द केली असल्याचे बोर्ड पाहून संतप्त झाले. उमेदवारांनी ठाणे, डोंबिवलीतील परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT