file photo 
मुंबई

विकासकांवर म्हाडा मेहरबान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने सेस इमारतींच्या पुनर्विकासाच्या योजनांना चुकीच्या पद्धतीने मान्यता दिल्यामुळे विकासकांना ८.६४ कोटींचा फायदा झाल्याचा धक्कादायक ठपका लोक लेखा समितीने (पीएसी) ठेवला आहे.

विशेष बाब म्हणजे सुमारे ५९.७६ कोटींचे ९६०.४६ चौरस मीटरचे अतिरिक्त क्षेत्र विकसाकाने म्हाडाला दिले नाही. याशिवाय ९८.९१ कोटी रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या विकासकांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने म्हाडाचे मोठे नुकसान झाल्याचा ठपकाही लोक लेखा समितीने ठेवला आहे.

विकास नियंत्रण नियमावलीच्या ३३(७) अंतर्गत मुंबईत ए श्रेणीतील सेस इमारतींचा पुनर्विकास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकूण चटई क्षेत्राच्या (एफएसआय) २.५ किंवा पुनर्विकासासाठी आवश्‍यक असणारा सध्या राहत असलेल्या इमारतीच्या क्षेत्रफळावर ५० ट्टके अधिक यापैकी ज्याचे प्रमाण अधिक आहे, तो एफएसआय पुनर्विकासासाठी मंजुर केला जातो.

पुनर्विकासात किमान २०.९० चौ. मीटर कारपेट देणे गरजेचे आहे. पुनर्विकासानंतर अतिरिक्त क्षेत्र इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला हस्तांतरित केला जातो. नगरविकास खात्याने किमान क्षेत्रफळ २७.८८ चौ. मी आणि एफएसआय ३ पर्यंत वाढविण्याचा निर्णय मे २०११मध्ये घेण्यात आला.

या सुधारित निकषांनुसार पुनर्विकासाला चालना मिळेल, अशी आशा होती. तसेच प्लींथ एरियापर्यंतचे कामही पूर्ण झाले नसल्याची अट नगरविकास खात्याने अट रद्द केली. याचा मोठा फायदा विकासकांना झाल्याचा ठपका लोक लेखा समितीने ठेवला आहे.

...तर विकासकांवर फौजदारी कारवाई होणार
९८.९१ कोटी रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या विकासकांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे म्हाडाचे मोठे नुकसान झाल्याचा ठपकाही लोक लेखा समितीने ठेवला आहे. मार्च २०१२ आर्थिक वर्षात हा प्रकार घडला असून संबंधित विकासकांवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस समितीने केली होती. सदर कारवाई तीन महिन्यांच्या आत करावी अशी शिफारसही लोक लेखा समितीतर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT