मुंबई

सचिन वाझेच्या जागी मिलिंद काठे यांची CIU प्रमुखपदी नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांची स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेला NIAने तपासादरम्यान अटक केली. त्यानंतर राज्य सरकारने सचिन वाझेवर निलंबनाची कारवाई केली. निलंबन होताना सचिन वाझे CIU म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनीट चा प्रमुख होता. त्यामुळे त्याच्या जागी कोणाची नियुक्ती होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये सचिन वाझेच्या जागी मिलिंद काठे यांना CIUच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले. मिलिंद मधुकर काठे हे गुन्हे शाखेच्या कक्ष २ चे निरिक्षक होते. त्यांची सध्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुकेश अंबानी धमकी प्रकरणानंतर गुन्हे शाखेतील ६५ जणांच्या बदलीनंतर मंगळवारी गुन्हे शाखेला आणखी २४ नवीन अधिकारी मिळाले. त्यातच काठे यांचीही नियुक्ती झाली.

नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेत अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या काही अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर गुन्हे शाखेचे प्रमुख सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी याबाबत आदेश काढून गुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या २४ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. तसेच वाझे यांच्यानंतर रिक्त झालेल्या जागी पोलीस निरीक्षक मिलिंद मधुकर काठे यांच्याकडे CIUची जबाबदारी दिली. याशिवाय, कक्ष तीनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Milind Kathe Crime Branch appointed CIU Chief replacing Sachin Waze)

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात NIAने काठे यांचीही चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला. अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास ज्या पथकाने केला त्यात काठे यांचाही समावेश होता. त्यामुळे तपास अधिकारी म्हणून त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT