मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुधाचा टॅंकर उलटला; महामार्गावर वाहनांचा खोळंबा

वसंत जाधव

नवीन पनवेल  : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे - मुंबई मार्गिकेवर सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास दुधाचा टॅंकर उलटला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही; मात्र महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. 

द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ उतारावर टॅंकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून टॅंकरने पुढे चाललेल्या ट्रकला ठोकर दिली. अपघातात कोणासही दुखापत झाली नाही; मात्र टॅंकरमधील दूध रस्त्यावर सांडले. त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने आणि दोन्ही वाहने दोन मार्गिकांवर उलटल्याने रस्ता बंद करावा लागला. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे काही काळासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली होती.

बोरघाट वाहतूक चौकीचे पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, उपनिरीक्षक महेश चव्हाण त्यांच्या पथकाने तत्कळ घटनास्थळी दाखल होऊन आयआरबीच्या हायड्रा व क्रेनने दोन्ही वाहन बाजूला काढून रस्त्यावर सांडलेले दूध बाजूला केले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. 
Milk tanker overturns on Mumbai-Pune expressway Vehicle congestion on the highway

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या ‘हलाल सर्टिफिकेट’वरून नवा राजकीय वाद; कोल्हापूरच्या निवडणुकीत मुद्दा तापला

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT