Employee Strike
Employee Strike 
मुंबई

राज्यातील लाखो कर्मचारी जाणार संपावर

चंद्रकांत खुताडे

डहाणू : राज्यातील कर्मचार्‍यांच्या बाबतीत सरकारने सरकारी-निमसरकारी, ज्येष्ठ-कनिष्ट असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकच म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सनदशीर मार्गाने प्रयत्न करत आहे. तरीही या मागणीचा विचार हे निगरगट्ट सरकार गांभीर्याने करत नसून योग्य तो निर्णय घेत नाही.

परिणामी, सरकारी कर्मचार्‍यांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार डहाणू यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. या मागणीवर सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या 20 ऑगस्टला महाराष्ट्रातील सर्व विभागातील लाखो कर्मचारी संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनने निवेदनातून दिला आहे. 

यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष नितिन तिडोळे, तालुकाध्यक्ष व्यंकट लोकरे, उपाध्यक्ष सीताराम देशमुख, सचिव शाहू भारती, सहसचिव मधुकर चव्हाण, पदाधिकारी अनुरथ हाके, बी.डी.जाधव यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

“1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी सेवेत दाखल कर्मचार्‍यांच्या पगारावर सरकारी आदेशाने दरोडा टाकला जात आहे. प्रत्येक कर्मचार्‍यांचे डीसीपीएस या गोंडस नावाखाली दहा टक्के मासिक वेतन कापून घेतले जाते. मात्र, याचा साधा हिशोबही कुणाकडे मिळत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारने हा अन्याय लवकरात लवकर दूर करावा.” 
 - शाहू संभाजी भारती (सचिव, पेन्शन हक्क संघटन शाखा डहाणू)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT