मुंबई

"माथेरानच्या राणी'ला पर्यटकांची पसंती; मध्य रेल्वेच्या महसुलात 33 लाखांची भर

कुलदीप घायवट

मुंबई  : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी "वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या "मिनी ट्रेन'मधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात 33 लाख 26 हजारांची भर पडली आहे. 

थंडीत माथेरानला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यासह दिवाळी, नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी माथेरान गाठले होते. माथेरानमधील वेगवेगळी स्थळे बघण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. सध्या माथेरान स्थानकापासून ते अमन लॉज मिनी ट्रेनमधून पर्यटक प्रवास करत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिनी ट्रेनची वाहतूक बंद होती; मात्र नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सुरू झाली. सुरुवातीला अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवेच्या दिवसाला चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या. दिवाळीनंतर मध्य रेल्वेने दिवसाला 12 फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात लाखोंची भर पडली. 

महिना प्रवासी संख्या महसूल

नोव्हेंबर- 16 हजार 946- 11 लाख 38 हजार 157 रुपये 
डिसेंबर- 28 हजार 186- 17 लाख 31 हजार 567 रुपये 
एकूण- 45 हजार 132- 28 लाख 69 हजार 724 रुपये 

पाच लाखांची तिजोरीत भर 

माथेरान मिनी ट्रेनला नववर्षात भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेनमधून 7 हजार 557 प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर यातून 4 लाख 91 हजार 298 रुपयांची भर मध्य रेल्वेच्या तिजोरीत पडली आहे. 

mini train of Matheran popular among tourists in winter session

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT