मुंबई

मज्जा वाटते म्हणून निर्बंध वाढवत नाहीय - आदित्य ठाकरे

'जे सत्य आहे ते समोर आणत आहोत व नागरिक त्याला प्रतिसाद देतायत'

वैदेही काणेकर

मुंबई: राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी मुंबईच्या लसीकरणासंदर्भात (vaccination in mumbai) आज बैठक घेतली. "मुंबईत वेगाने लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाचं कसं नियोजन करायचं? त्याच्या नियोजनासाठी बैठक घेतली. लस हातात आल्यास सर्व मुंबईकरांचे लसीकरण करू शकतो" असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Minister aditya thackeray talk about vaccination in mumbai)

"सुप्रीम कोर्टापासून पीएमनी मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे. जे सत्य आहे ते समोर आणत आहोत व नागरिक त्याला प्रतिसाद देतायत, असे आदित्य यांनी सांगितले. लॉकडाउन, निर्बंधांच्या मुद्यावर म्हणाले की, "कुणाला मज्जा वाटतेय म्हणून निर्बंध वाढवतोय किंवा काढत नाहीय. ही लाट गंभीर आहे." "आम्ही तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी करतोय. आपण आकडे लपवलेले नाहीत. लोकांची जबाबदारी सरकारवर आहे" असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत वेगाने लसीकरण करता यावे, यासाठी मुंबई महापालिकेने सुद्धा लस खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झालीय. नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मुंबईत सरकारी बरोबर खासगी मार्गानेही मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. अनेक खासगी सोसायट्या लसीकरणासाठी थेट लस पुरवठादार कंपन्या आणि हॉस्पिटल्सशी संधान बांधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT