chandrakant Patil sakal
मुंबई

Mumbai News : मातोश्री वसतिगृहात मंत्र्यांचे पीए,अधिकारी! - चंद्रकांत पाटील यांची कबुली

मातोश्री वसतिगृहात घुसखोरी केलेले विद्यार्थी, मंत्र्यांचा पीए, मंत्रालयातील एक अधिकारी बचाव करत असल्याने येथे खोल्यांचे टाळे तोडण्याचे प्रकार झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

मातोश्री वसतिगृहात घुसखोरी केलेले विद्यार्थी, मंत्र्यांचा पीए, मंत्रालयातील एक अधिकारी बचाव करत असल्याने येथे खोल्यांचे टाळे तोडण्याचे प्रकार झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

मुंबई - चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आणि उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘मातोश्री’ शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांसोबत काही खोल्यांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी राहत असल्याची कबुली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरात दिली. ‘सकाळ’ने यासंदर्भात १७ नोव्हेंबरला वृत्त प्रकाशित करून वास्तव समोर आणले होते.

मातोश्री वसतिगृहात घुसखोरी केलेले विद्यार्थी, मंत्र्यांचा पीए, मंत्रालयातील एक अधिकारी बचाव करत असल्याने येथे खोल्यांचे टाळे तोडण्याचे प्रकार झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्याच विषयाच्या आधारे विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

मुंबईतील मातोश्री वसतिगृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचा आणि शासकीय अधिकारी, शिक्षण पूर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी कब्जा केल्याने इतर विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याची बाब शिक्षक आमदार नागो गाणार, उमा खापरे, ॲड. निरंजन डावखरे, ॲड. मनीषा कायंदे या सदस्यांनी उपस्थित केली होती.

मंत्री पाटील यांनी त्यावरील उत्तरात ही बाब अंशत: खरी असल्याचे म्हटले आहे. तसेच या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक २३ मे २०१६ अन्वये शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवेशाची नियमावली तयार करण्यात आली असून, त्यानुसार प्रवेश देण्यात येतात. शैक्षणिक सत्र संपूनही वसतिगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांकडून दंडात्मक शुल्क आकारून त्यांच्याकडे असलेल्या खोल्या रिक्त करून घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT