file photo 
मुंबई

अल्पवयीन आरोपी मुलीवर बलात्कार 

अनिश पाटील

मुंबई : माहीम येथे समुद्र किनाऱ्यावर एका सुटकेसमध्ये मानवी अयवय सापडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या (पोक्‍सो) अंतर्गत गुन्हा दाखल करीत अधिक तपासासाठी तो वाकोला पोलिसांकडे वर्ग केला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीसह अल्पवयीन मुलीचा प्रियकर आणि इतर तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटकेस हत्येप्रकरणी सध्या अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि त्यांना या गुन्ह्यात मदत करणारा आरोपी अटकेत आहे; तर या मुलीवर बलात्कार प्रकरणातील तिघांचा शोध सुरू आहे. माहीम योथील समुद्रकिनाऱ्यावर मानवी अवयव असलेली सुटकेस सापडल्यानंतर याप्रकरणी मृत व्यक्तीच्या दत्तक मुलीसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. प्रथम ही संशयित सज्ञान वाटत असल्याने पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली; मात्र तिच्या कुटुंबियांकडून प्राप्त झालेल्या जन्माच्या दाखल्यावरून संशयित मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिची डोंगरी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

त्या वेळी तिने मृत पिता, अल्पवयीन प्रियकर व आणखी तिघांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ही बाब डोंगरी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांना कळवली. यानंतर मुलीची अधिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला.

पित्याची हत्या ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी या मुलीचे प्रियकराशी शारीरिक संबंध आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर मुलीचा जबाब दाखल करून मृत पिता, तिचा अल्पवयीन प्रियकर यांच्यासह इतर तिघे अशा पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला; मात्र हा सर्व प्रकार वाकोला येथे घडल्याने हा गुन्हा अधिक तपासासाठी वाकोला पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे. वाकोला पोलिसांनी गुन्हा वर्ग होऊन आपल्याकडे आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून तपास सुरू असल्याचे सांगितले. 

मुलीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष 
अनंतचतुर्दशी असल्याने पीडित मुलगी घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज परिसरातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती. रात्रीची वेळ असल्याने नाचण्याच्या ओघात तिच्या एका मित्राने तिला बाजूला घेऊन जात काम असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी दोन मित्रांच्या साह्याने दुचाकीवर बसवून तिला भटवाडी मैदानात नेण्यात घेऊन तिघांनी या पीडित मुलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर मुलगी घरी आली. त्यानंतर दोन दिवसांनी ही गोष्ट तिने सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. यामुळे तिने घाबरून जाऊन पोलिस तक्रारदेखील केली नाही. तसेच तिला दत्तक घेणाऱ्या पित्यानेही लैंगिक छळ केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT