Dombivali Crime Sakal
मुंबई

Dombivali Crime : वेश्या व्यवसायातून सुटका व्हावी म्हणून अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

घरातील मालक तिच्यावर अत्याचार करत होते! पोलिसांनी ताब्यात घेताच धक्कादायक माहिती उघड.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - घरात काम करणारी अल्पवयीन मुलगी घरातील चार वर्षीय चिमुरड्याला घेऊन पसार झाली होती. अपहरणकर्त्या 17 वर्षीय मुलीला काही तासातच पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने हे कृत्य का केले याची माहिती समजताच पोलिसांना देखील धक्का बसला आहे. सदर मुलीला बांग्लादेश येथून फुस लावून भारतात आणत तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते.

घरातील मालक तिच्यावर अत्याचार करत होते यातून बाहेर पडण्यासाठी तिने हे कृत्य केल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी सतीश रजक व सचिन रजक या भावांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

मानपाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, मानपाडा पोलीस ठाणे येथे 13 एप्रिल रोजी अपहरणाचा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये अशी तक्रार मिळाली की घर कामासाठी असलेली एक अल्पवयीन मुलगी घरातील बाळाला घेऊनच पसार झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ बाळाचा शोध घेण्यासाठी सदर मुलीचा शोध घेऊ लागलो.

आमची तपास पथक त्याचा शोध घेत होती. अवघ्या काही तासात भिवंडी येथून ताब्यात घेतल. त्यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता आम्हाला एक धक्कादायक बातमी समोर आली. आम्हाला असं कळलं की ती स्वतः पिडीत असून तिला बांग्लादेश मधून वेश्या व्यवसायासाठी तिची आई मावशी यांच्यासह भारतात आणलेल आहे.

आणि तिला ज्या घरात कामास ठेवली होती, त्या घरातील मुख्य पुरुष सतीश रजक आणि त्याचा चुलत भाऊ यांनी त्या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी पाठवल होत. तसेच तिच्यावर स्वतः शारीरिक अत्याचार केले. तिच्या तक्रारीवरून त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आल आहे. तसेच पीडित मुलीला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असून अपहृत बाळ ते आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

मुलीच्या चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, बांग्लादेशातील गरिबीच्या कारणामुळे तेथील लोकांची भारतात नोकरी करण्यासाठी इच्छा असते. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन शक्यतो अल्पवयीन मुलींना गारमेंटच्या दुकानात नोकरी लावतो, ब्युटी पार्लर मध्ये नोकरी लावतो, चांगला पगार मिळेल असे आमिष दाखवून आणले जाते. सदर पीडित मुलीला गारमेंट मध्ये नोकरी लावतो असे सांगून तिला आणण्यात आले होते.

येथे आणल्यानंतर तिला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. बाहेर जाण्याचे मार्ग बंद केल्यामुळे त्या अल्पवयीन मुलीकडे दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. तेथून बाहेर पडण्यासाठी व त्या व्यवसायातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली मुलीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील उर्वरित आरोपींची पोलीस शोध घेत असून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Video: जुनं वचन पाळलं! मित्राची सैन्यात निवड होताच खांद्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक; कोल्हापूरचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT