मुंबई

मीरा भाईंदर, वसई-विरारला पोलिस आयुक्त मिळाले परंतु कामकाजासाठी मुख्यालयच नाही

संदीप पंडित


विरार - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने मीरा भाईंदर आणि वसई विरारसाठी नव्या  पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली होती. काल या शहरासाठी पहिले पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नेमणूक शासनाने केली. परंतु मुख्यालयाचे काय काय ? हा प्रश्न मात्र अधांतरीतच राहिला आहे.

आयुक्तालयाची घोषणा होऊन वर्ष  झाले. पण कार्यालयाचा पत्ता नाही. पोलीस आयुक्तालय भाईंदर मध्ये होणार याला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून त्यासाठी मीरा एमआयडीसी मध्ये जागाही आरक्षित करण्यात आली. असे असले तरी ती जागा विकसित करण्यास जवळपास २/४ वर्ष लागणार असल्याने आयुक्त कुठे बसणार आणि आपला कारभार कुठून चालवणार हा प्रश्न मात्र तसाच राहिला आहे. हे कार्यालय सुरु झाल्यास याठिकाणी २४८८ नवीन पदाची निर्मिती होणार आहे. 

वसई  विरार आणि मीरा भाईंदरची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी पाहता याठिकाणी नवे आयुक्तालय निर्माण व्हावे या साठी अनेकवर्षापासून प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांत  निवडणुकीच्या तोंडावर यश आले आणि शासनाने वसई विरार आणि मीरा भाइंडरसाठी  नव्या पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली. हे पोलीस  आयुक्तालय 1 जानेवारी 2020 ला सुरु होणार होते परंतु आयुक्तालय नक्की कुठे होणार नवे आयुक्त कोण असतील याबाबत शासनाने निर्णय घेतला नव्हता. 

     शासनाने 13 सप्टेंबर 2019 ला आयुक्तालयाची घोषणा केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यालय मीरा भाईंदर मध्ये करण्याची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली होती. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा करत मुख्यालय मीरा भाईंदर मध्येच करण्याला शासनाकडून हिरवा झेंडा मिळवल्याने मुख्यालय भाईंदर मध्येच होणार  यावर शिक्का मोर्तब झाले असले तरी आता आयुक्त बसणार कुठे हा प्रश्न अधांतरीतच राहिला आहे. 

पूर्वी वसई विरार आणि मीरा भाईंदरचा कारभार ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयातून चालत होता परंतु नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यावर पालघर जिल्ह्यासाठी पोलीस अधिक्षक आल्यानंतर वसई विरारच्या सामावेश त्यात करण्यात आला तर मीरा भाईंदर मधील पोलीस ठाण्याचे काम ठाणे ग्रामीण पोलीस  अधीक्षक कार्यालयातून सुरु आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT