मुंबई

सिलेंडरच्या स्फोटानं हादरलं मिरा रोड, मध्यरात्री एकामागून एक स्फोट

सचिन सावंत

मुंबई: गॅस सिलेंडर स्फोटानं मध्यरात्री मिरा रोड हादरून गेलं. मध्यरात्री 2 वाजता राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत सिलेंडरचे स्फोट झाले. त्याठिकाणी आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या. त्या दोन्ही गाड्यांना भीषण आग लागली होती. त्यानंतर त्यातील भरलेल्या सिलेंडरचे एकामागून एक स्फोट झाले. 

जवळपास 7 स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले. स्फोट एवढा तीव्र होता की, स्फोटामुळे आजूबाजू घरांच्या काचा फुटल्या. सिलेंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा हा शेजारील सोसायटीच्या आवारात पडला. सिलेंडरच्या उडलेल्या तुकड्याने दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.

स्फोटानंतर लगेच मिरा-भाईंदर अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन गाड्या, दोन टॅंकर, एक टिटीएल गाडी, तसेच 54 जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांनी तासाभरात परिस्थिती नियंत्रणात आणली. याठिकाणी अर्धा किमीवरुन अग्निशमन दलाचे कर्मचारी सीडीवरुन पाण्याचा मारा करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ती जागा आरक्षित असल्याने पूर्णपणे मोकळी होती. तेथे नेहमी भरलेल्या सिलेंडरच्या गाड्या उभ्या केल्या जातात. तसेच आजूबाजूल इतर वाहन देखील पार्किंग केलेली असतात. दरम्यान काही नागरिकांनी येथे अवैद्य सिलेंडरची रिफेलिंग होत असल्याचा ही आरोप केला आहे. विशेष म्हणजे ही जागा वसई विरार- मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या अगदी मागे 100 मीटर अंतरावर आहे.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mira road 7 cylinder blast fireman and local got injured

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

माहेरी एकुलती एक लेक पण सासरी खटल्याचं घर! अजूनही २ अविवाहित नणंदांसोबत संसार करतायत ऐश्वर्या नारकर

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

Shiv Sena Symbol Case : 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल'; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादावर संजय निरुपम यांचा मोठा दावा, शिंदेंच्या बंडाबाबतही केलं भाष्य

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT