ticket-window.
ticket-window. 
मुंबई

10 रुपयांच्या गैरसमजातून उल्हासनगर रेल्वे स्थानकाची तिकीट खिडकी तोडली

दिनेश गोगी

उल्हासनगर - दोन तिकिटाचे उमरगाव ते उल्हासनगर 80 रुपये मग रिटर्न तिकिटाला 90 रुपये कसे? या 10 रुपयांच्या गैरसमजातून एका मद्यधुंद प्रवाशाने रेल्वे स्थानकावरील खिडकी तोडल्याची घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घडली. स्टेशन मास्तरने तक्रार केल्यावर या प्रवाशाला बदलापूर आरपीएफच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

काल उमरगाव येथील एक दाम्पत्य उल्हासनगरात आले होते. त्यांनी उमरगाव स्थानकावरून व्याया वसई कोपर ते उल्हासनगर असे दोन तिकीटे 80 रुपयात काढले होते. काल सायंकाळच्या सुमारास ते परतीच्या प्रवासाला जात असताना त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील तिकीट खिडकीवर उमरगावचे दोन तिकीट मागितले. येथून उमरगावचे तिकीट मिळत नाही. तुम्हाला कल्याण व्याया दादर ते उमरगाव असे तिकीट मिळेल. शिवाय कल्याणसाठी प्रत्येकी 5 रुपयांची दोन तिकिटे घ्यावी लागतील. सुरवातीला होकार दिल्यावर आणि 90 रुपये मोजण्याची वेळ आल्यावर प्रवाशाने वाद घातला. येताना दोन तिकिटाचे 80 रुपये आणि जाताना 90 रुपये कसे? या प्रश्नावर प्रवासी अडून बसला. अहो येथून उमरगावचे डायरेक्ट तिकीट मिळत नसल्याने तुम्हाला कल्याण ते उमरगाव तिकीट 80 रुपयात दिले. आणि कल्याणपर्यंत जाण्यासाठी प्रत्येकी 5 रुपयांची दोन तिकिटे दिल्याने 90 रुपये झाले असे समजून सांगण्याचा प्रयत्न तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने केला. मात्र ऐकण्याचा किंबहूना समजून घेण्याच्या मनस्थितीत नसणाऱ्या प्रवाशाने मागचा पुढचा विचार न करता थेट काऊंटरच्या काचेच्या खिडकीवर ठोसा मारला. त्यात काच तुटली.

मद्यधुंद प्रवाशाने पळ काढला पण नागरिकांनी त्याला पकडले. स्टेशन मास्तर मनोहर पाटील यांनी याबाबत तक्रार केली असून आरपीएफ बदलापूर पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. सोनार असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्या या प्रतापामुळे त्याच्या पत्नीला मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT