Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News : नाले सफाई ठेकेदाराचा गलथान कारभार

नाल्यातील गाळाने नव्या सिमेंट रस्त्याचे रूपच पालटले

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मधील कावेरी चौक ते आजदे गावाला जोडणाऱ्या नव्या कोऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे रूपच पालटलं आहे. नाले सफाई करणाऱ्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे नाल्यातील गाळ पूर्ण रस्त्यावर पसरून रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीतून नागरिकांना चालावे लागत असून काही पादचारी घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी शहरात गटारे, नाले सफाईस सुरवात झाली असून नाल्यातील गाळ सुकण्यासाठी ठेकेदार रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे परिसरात गाळ सुके पर्यत नागरिक, दुकानदार यांना घाणी सोबतच दुर्गंधी सहन करावी लागते. एमआयडीसी भागातील नाले सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामुळे स्वच्छ सुंदर दिसत असतानाच या गाळामुळे त्याला घाणीचे स्वरूप आले आहे. कावेरी चौक ते आजदे गावाला जोडणाऱ्या नव्या कोरा सिमेंट रस्तातर या गाळामुळे दिसतच नाही आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यातील गाळ या रस्त्याच्या कडेला ठेकेदाराकडून टाकण्यात आला आहे. हा गाळ सुकण्यासाठी रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आहे. मात्र हा ओला गाळ सर्व रोडवर पसरला असून त्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे, तसेच रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नागरिकांना त्यातूनच चालावे लागत असून चालताना नागरिक पाय घसरून पडत असल्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी सांगितले. दोन महिन्यापूर्वी नवीन काँक्रीट रस्ता तयार केला आहे. नाले सफाई करणारा ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी नाल्यातील गाळ रस्त्यावर टाकला आहे.

हा गाळ रस्त्यावर पसरून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे तसेच नागरिकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा गाळ सुकण्यासाठी आणखीन चार-पाच दिवस लागतील. तोपर्यंत ही घाण येथे अशीच राहणार का ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. यामुळे हा गाळ लवकर उचलावा अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT