मुंबई

13 वर्षीय मुलीचे तोंड दाबून पोलिसाने केले अश्लील चाळे

अनिश पाटील

मुंबई, ता.15 : घराशेजारी खेळणाऱ्या 13 वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिला बाजूला नेऊन 28 वर्षीय पोलिसानेच तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा गंभीर प्रकार घाटकोपर परिसरात घडला आहे. हा प्रकार कोणालाही प्रकार न सांगण्यासाठी आरोपीने मुलीला धमकावल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आरोपी पोलिस शिपाया विरोधात विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपी पोलिस शिपायाने तिचे तोंड दाबून बाजूला नेले व तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर हा प्रकार कोणालाही सांगू नको अन्यथा परिणाम वाईट होतील, असे आरोपीने मुलीला धमकाले. मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर सोमवारी रात्री याप्रकरणी कुटुंबियांनी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 354, 354 (ब), 341, 506 सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 8, 10, 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली.

आरोपी पोलिस शिपाई मुलीच्या शेजारीच राहणारा असून विवाहीत आहे. सध्या तो विलेपार्ले पोलिस ठाण्यात कार्यारत आहे. याबाबतची माहिती त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी आरोपीला अटक करण्यात आल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरोधात विभागीय कारवाईची शिफारसही करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

misconduct of police man with 13 years old girl case registered in ghatkopar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT