parambir singh esakal
मुंबई

Parambir Singh : बेपत्ता परमबीर सिंग 'या' शहरात असल्याचा अंदाज

चौकशी समितीपुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन अंदाज

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारलाही सापडत नसलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा अखेर ठावठिकाणा लागल्याची चर्चा आहे. ते पंजाबची राजधानी चंदीगडमध्ये असल्याचा अंदाज आहे. कारण परमबीर सिंग यांनी चौकशी आयोगापुढं एक प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्याला जोडलेली पॉवर ऑफ अॅटर्नी चंदीगड शहरात तयार करण्यात आली आहे.

इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं असून या वृत्तानुसार, मुंबईत निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय चौकशी आयोगापुढं परमबीर सिंग यांच्यावतीनं अॅड. अभिनव चंद्रचूड आणि अॅड. असिफ लांपवाला यांनी हजेरी लावली आणि पावर ऑफ अॅटर्नीसह प्रतिज्ञापत्र सादर केलं. ही पॉवर ऑफ अॅटर्नी चंदीगडमध्ये तयार करण्यात आलेली आहे. यानुसार, महेश पांचाळ या व्यक्तीला परमबीर सिंग यांच्यावतीनं प्रातिनिधीक स्वरुपात आयोगापुढं हजेरी लावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलंय की, सिंग यांच्याकडे उलटतपासणी करण्याचा कोणताही पुरावा नाही. समितीपुढे कोणीही कागदपत्रे मांडायचे नाहीत.

या प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलंय की, “जे काही उघड करणे आवश्यक होते ते परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उघड केलं होतं आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे. म्हणून त्यांच्या पत्रात जे नमूद केले आहे, त्याशिवाय त्याच्याकडे जोडण्यासारखे आणखी काही नाही. परमबीर सिंग यांनी २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांना तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचे आरोप करणारं पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाटी चांदीवाल आयोग नेमला होता. तसेच सीबीआयने देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरु केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत बनत आहेत 4 मोठे राजयोग; माता लक्ष्मीच्या कृपेने 'या' राशी होणार मालामाल, करिअरमध्येही प्रगतीचे संकेत

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

SCROLL FOR NEXT