kem hospitral 
मुंबई

केईएममधील 'तो' बेपत्ता रुग्ण अखेर सापडला; 15 दिवसांनी लागला तपास.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केईएम रुग्णालयातून अचानक बेपत्ता झालेले 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर 15 दिवसांनी तपास लागला आहे. या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात सापडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियांना कळवले असून नातेवाईकांनी मृतदेह ओळखून तो ताब्यातही घेतला आहे.

केईएम रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण सुधाकर खाडे हे अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत खाडे कुटुंबीयांना मदत केली होती. यानंतर शोधाशोध झाली आणि अखेर सुधाकर खाडे यांचा मृतदेह सापडला.

सुधाकर खाडे यांना थंडी, ताप आणि श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 14 मे रोजी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 15 मे रोजी खाडे यांच्या कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. आणि त्यांच्या पत्नी आणि बहिणीला पालिकेने भोईवाडा येथे क्वारंटाईन केले.

या प्रकरणी सुधाकर खाडे यांच्या कुटुंबीयांनी भाजप नेते किरीट सोमैय्या यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. खाडे यांच्या जावयाने 25 मे रोजी भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. किरीट सोमय्या यांनी पुरुषोत्तम खाडे यांच्यासोबत जावून संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. पालिका रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला होता.

तुमचा पेशंट खाटेवर नाही:

दरम्यान, 19 मे रोजी पहाटे 5 वाजता अचानक केईएम रुग्णालयातून आलेल्या दूरध्वनीवरून “तुमचा पेशंट खाटेवर नाही. आम्ही तपास करतो दुसऱ्या कुठल्या वॉर्डमध्ये आहे का? आणि तुम्हाला कळवतो”, असे सांगण्यात आले. मात्र रुग्णालयात सर्वत्र शोधल्यानंतर ही बेपत्ता खाडे यांचा ठावठिकाणा लागला नाही.

missing patient in KEM finally found in hospital read full story  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT