मुंबई

शौचालयात सापडलेला मृतदेह बेपत्ता रुग्णाचा? शिवडी क्षयरोग रुग्णालयाच्या अधीक्षकांना संशय

मिलिंद तांबे

मुंबई : शिवडीतील क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात सापडलेला मृतदेह कोव्हिड विभागामधील बेपत्ता रुग्णाचा असल्याचा संशय 
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी व्यक्त केला आहे. क्षयरोगग्रस्त असलेल्या संबंधित रुग्णाला कोरोनाचीही बाधा झाल्याने त्याला कोव्हिड विभागात दाखल करण्यात आले होते. तिथे 11 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील एक रुग्ण 4 ऑक्‍टोबरसापून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. 

सूर्यभान यादव (27) असे संशयित रुग्णाचे नाव आहे. क्षयरोग रुग्णालयाच्या शौचालयात 18 ऑक्‍टोबर रोजी त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो साधारण 12 दिवसांपासून तिथे पडून असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सूर्यभान क्षयरोगाच्या उपचारासाठी 30 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. मात्र, तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याला पहिल्या मजल्यावरील कोव्हिड विभागात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 4 ऑक्‍टोबरपासून तो बेपत्ता होता. रुग्ण बेपत्ता होण्याबाबत आम्ही मिसिंग रिपोर्टही दाखल केला होता. क्षयरोग रुग्णालयात रुग्ण बेपत्ता होण्याचे प्रकार बऱ्याचदा घडत असतात. त्यामुळे संबंधित मृतदेह त्या बेपत्ता रुग्णाचा असण्याची शक्‍यता आहे, असे डॉ. आनंदे म्हणाले. 

चुकीच्या पत्त्यामुळे शोध अवघड 
कोरोना रुग्णांना हॅपी पायपोक्‍सिया लक्षणांचा त्रास होत असतो. असा रुग्ण अचानक कोसळण्याची शक्‍यता असते. या प्रकारातही असेच काहीसे झाले असण्याची शक्‍यता आहे, असे डॉ. ललितकुमार आनंदे म्हणाले. क्षयरोग रुग्णालयात दाखल होणारे अनेक रुग्ण चुकीचा पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंदवतात. त्यामुळे त्यांचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात अनेक अडचणी येतात. सूर्यभान यादवनेही चुकीचा पत्ता व संपर्क क्रमांक दिला असल्याने त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी आल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

चौकशीसाठी समिती 
संबंधित घटनेची मुंबई महापालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेतली आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खात्याकडून 22 ऑक्‍टोबर रोजी समिती नेमण्यात आली आहे. उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (विशेष रुग्णालय) यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या समितीने तीन ते चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 
----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT