Ganpat Gaikwad  esakal
मुंबई

Ulhasnagar News : आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर करण्यात येणार; परिसरात संचारबंदी

कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आलेली असून, त्यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. बुधवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालयाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

2 तारखेला हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर, विकी गोणात्रा, रणजित यादव याना अटक झालेली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून उद्या 14 तारखेला या सर्वांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान पहिल्या वेळी गणपत गायकवाड समर्थकांनी न्यायालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली होती.आता असा पून्हा अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी थेट संचारबंदीच लागू केली. वाहतुकीत देखील बदल करण्यात आले असून 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही. तसेच माध्यम प्रतिनिधींना देखील मज्जाव करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

गोळीबार केल्यानंतरही आमदार गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मी गोळीबार केला असून, मला कोणताही पश्चाताप नसल्याचे विधान करीत मुख्यमंत्र्यांवर आरोप केले होते. तसेच दुसऱ्या दिवशी गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी थेट पोलिस व्हॅनच्या बाहेर डोके काढत प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस माध्यम प्रतिनिधींना लांब ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT