mla ganpat gaikwad shooting case ulhasnagar crime branch investigation Sakal
मुंबई

Ulhasnagar Shooting : आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण; द्वारली गावात जागेची पहाणी करत गुन्हे शाखेचा तपास सुरू

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून 6 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून 6 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

त्यातील एक पथक सोमवारी दुपारी द्वारली गावात दाखल झालं. जागेवर जात त्यांनी पहाणी करून तपास सुरू केला आहे. तसेच तकार यांची चौकशी करत जबाब नोंदविण्यास पोलिसांनी सुरवात केली आहे.

द्वारली येथील जागेवरून भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. या वादातून आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला आहे.

आमदार गायकवाड यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तर महेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर क्राईम युनिट 4 चे वरिष्ठ अधिकारी राजू सोनवणे,

ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर गुन्हे शाखेच्या वतीने केला जात आहे. त्यासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

गुन्हा घडला त्यावेळी कोण कोण उपस्थित होते, त्यांची ओळख पटविणे, वाद नेमका कसा झाला, जमीन मूळ कोणाची, संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे, कागदपत्रे जमा करण्याचे काम या पथकांना दिले गेले आहे.

तसेच सोमवारी या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार चैनू जाधव यांची चौकशी करण्यात आली आहे. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात ही चौकशी केली गेली. अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी स्वतः चैनू जाधव यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर जागामालकाने माध्यमांसमोर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी नेमका व्यवहार काय झाला होता याबाबत माहिती दिली. “संबंधित जागा ही पावणे पाच एकर आहे. ही जागा 1996 मध्ये विकली होती.

संबंधित जागा ही मूळ जागा मालकाने प्रमोद रांका यांना विकली होती. त्यांनी आमचा आजपर्यंत व्यवहार पूर्ण केलाच नाही. पैसे दिले नाही. नंतर पैसे देऊ, असं म्हणत आमचे पैसे रखडवले. त्यांनी अर्धेच पैसे दिले होते. दिवसेंदिवस वर्ष वाढत गेले.

मग जागेला भाव वाढत नाही का? आमदार गणपत गायकवाड हे रांका यांच्या माध्यमातून पार्टनर म्हणून पुढे आले. ते आमच्या शेतावर येऊन डायरेक्ट कम्पाउंड बांधायला लागले. त्यांनी एवढे वर्ष सातबारा रांका यांच्या नावावर केला नाही आणि आता लगेच झालं. म्हणजे राजकारणच आहे.

त्यासाठी आम्ही दाद मागायला महेश गायकवाड यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की, तुम्हाला न्याय मिळवून देतो किंवा सेटलमेंट करुन देतो. निपटून घेऊ. पण त्यांनी तसं काही केलं नाही. याउलट त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला”, अशी प्रतिक्रिया मूळ जमीन मालकाने दिली.

जागेचा स्पॉट महत्त्वाचा

कल्याण पूर्वेत मलंगगड डोंगराच्या दिशेने एक रस्ता जातो. या रस्त्याला मलंगगड रोड असंही म्हणतात. कल्याण पूर्वेत चक्की नाकाच्या पुढे सरळ हा रस्ता मलंगगडच्या दिशेला जातो. चक्की नाका आणि नेवाळी नाका यांच्या मध्यभागी द्वारली गाव आहे. या परिसरात आता मोठमोठे बांधकामाचे प्रोजेक्ट्स आहेत. या परिसरात जमिनीचे भाव गगनाला पोहोचले आहेत.

आजूबाजूच्या परिसरात टोलेजंग इमारती आता उभ्या राहत आहेत. मोठमोठ्या बांधकाम कंपन्यांनी परिसरात जागा घेतल्या आहेत. पुढच्या काळात इथे टोलेजंग इमारतींची मोठी लोकवस्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा महत्त्वाची आहे. या जागेची किंमत आजच्या तारखेला कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या जागेवरुन हा संघर्ष जास्त पेटलेला बघायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT