Geeta Jain 
मुंबई

Gita Jain: आमदार गीता जैन यांनी अभियंत्याला भर रस्त्यात लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

मीरा भाईंदर महापालिकेतील अभियंत्याची कॉलर पकडत त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील अभियंत्याची कॉलर पकडत त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळं जैन या वादाच्या भोवऱ्या त अडकल्या असून आपल्या या कृतीवर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. (MLA Geeta Jain has hits Meera Bhayandar Municipal corporation engineer video viral)

काय घडलं नेमकं?

महापालिका हद्दीतील एका कुटुंबाचं घर पाडण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यासह पथक गेलं होतं. राहत घर पडून बेघर होण्याच्या भीतीनं या कुटुंबानं आमदार गीता जैन यांच्याकडं धाव घेतली. जैन या घटनास्थळी दाखल झाल्या अन् नियमावर बोट ठेवत कारवाईचा बडगा कशासाठी? असा जाब विचारला.

"लहान मुलं असलेलं घर पाडायला तुम्ही आला आहात माणसं आहात की राक्षस" असं जैन यांनी अभियंत्याला सुनावलं. यावेळी ज्या महिलेच्या घरावर हातोडा पडणार होता ती पीडित महिला जैन यांना रडून कारवाईबाबत सांगत होती. याचवेळी अचानक आमदार जैन चिडल्या आणि त्यांनी अभियंता शुभम पाटील यांची कॉलर पकडत त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आपल्या या कृतीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार गीता जैन म्हणाल्या, "मी अभियंत्याशी बोलताना पावसाळ्यात अनधिकृत असली तरी त्या घरांमध्ये कोणी राहत असल्यास ती तोडू नयेत असे शासन आदेश आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून देत होते. पण मी बोलत असताना अभियंता हसत असल्यानं आपला पारा चढला आणि मी त्याच्या कानशिलात लगावल्या' (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT