Gita Jain Latest News in Marathi Sakal
मुंबई

आता पुढे असंच होणार का? नाट्यगृह कर्मचाऱ्यावर महिला आमदार भडकल्यानंतर दिग्दर्शकाचा थेट सवाल; Video Viral

वेळेत नाटकाचा प्रयोग सुरू न झाल्यामुळे संतापलेल्या आमदार जैन यांनी बुकिंग कर्मचाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आमदार गीता जैन यांनी एका अभियंत्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंर त्या चांगल्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे नाटकाला उशिर झाल्यामुळे गीता जैन या थिएटरच्या बुकिंग कर्मचाऱ्यावर संतापल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, मीरा भाईंदर महापालिका नाट्यगृहातील हा व्हिडिओ असून पाच वाजता असणारा प्रयोग आधीचा प्रयोग संपवायला वेळ लागला त्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता. तर साडेसहा वाजले तरी नाटकाचा प्रयोग सुरू न झाल्यामुळे संतापलेल्या आमदार जैन यांनी बुकिंग कर्मचाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं.

"ज्यांना तुम्ही पाचचा वेळ दिला त्यांना साडेसहापर्यंत थिएटर देत नाहीत. मला कुणाशीही काहीच बोलायचं नाही, तुम्ही मला लिहून द्या की सहा वाजता हॉल दिला आहे. नाट्यगृह चालवाच्या नावाखाली असे धंदे करता का?" अशा शब्दांत त्यांनी बुकिंग अधिकाऱ्याला झापलं आहे. या प्रकरणानंतर दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी संताप व्यक्त केला असून आमदार जैन यांचा निषेध केला आहे.

"आता पुढे हे असच होणार का? आमदारांचा पुन्हा मराठी द्वेष? वर्षानंतर पाहिले मराठी नाटक लागले त्यात आमदारांनी घातला गोंधळ... हिंदी नाटक उशीरा सुरू झाले म्हणून आमदारांनी मराठी नाटक इतक्या उशीरा का संपवले म्हणून अधिकाऱ्यांना झापले..

हे मराठी राज्य आहे इथल्या नाट्यगृहात हक्क मराठीचाच, हिंदी नाटकासाठी भांडणाऱ्या आमदार वर्षभर तांत्रिक अडचण होती मराठी नाटक लागत नव्हते त्यावेळी कुठे होत्या? त्यावेळी असा पारा का चढवला नाही?

मराठी राज्यात आमदार आहात हे दरवेळी का विसरता??

आता २०२४ ला घरी बसवविण्याची वेळ आली आहे. आमदारांचा जाहीर निषेध"

अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT