Ajit Pawar Sakal
मुंबई

Thane News : आमदार जितेंद्र आव्हाडांना धक्का! शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकासह असंख्य कार्यकर्ते अजितदादा पवार गटात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला जाहीर प्रवेश.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

हा जाहीर पक्ष प्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. याचदरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, माजी नगरसेविका रिटा यादव, माजी परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील माजी नगरसेविका रुपाली गोटे, माजी नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेवक शेख जफर नोमानी, माजी नगरसेविका हफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफील शेख, माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सर्फराज अन्सारी, माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहफूज (मामा) शेख, सय्यद शमविल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्ते पदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्ष पदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा-कळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2030 Commonwealth Games : २०३०च्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा'बाबत मोठी अपडेट!, यजमान शहर म्हणून अहमदाबादची शिफारस

Pakistan Afghanistan: काबूलवर पाकिस्तानचा बॉम्बवर्षाव, अफगाणिस्तानकडून ड्रोन हल्ला; 48 तासांची शस्त्रसंधी

T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये टॉप लीडरसह तब्बल १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण?

Latest Marathi News Live Update : सर्वोच्च न्यायाधीशांवरील हल्ल्याचा स्वाक्षरी आंदोलनाने निषेध

SCROLL FOR NEXT