Suresh Mhatre sakal
मुंबई

Suresh Mhatre : म्हात्रे यांचे गोदाम ‘सील’ करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. या घोषणेनंतर काही तासांतच त्यांच्या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे पथक कारवाई करण्‍यासाठी पोहचले.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. या घोषणेनंतर काही तासांतच त्यांच्या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे पथक कारवाई करण्‍यासाठी पोहचले. मात्र गोदामावरील कोणताही कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती दिल्याने कारवाई न करताच पथकाला परतावे लागल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

ही कारवाई राजकीय दबावातून करत असल्याची टीकाही त्यांनी केली. म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच भिवंडी येवाई येथील म्हात्रे यांच्या ‘आर. के. लॉजी वर्ल्ड’ या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे एक पथक गुरुवारी सायंकाळी गोदाम ‘सील’ करण्याची कारवाईसाठी आले. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे.

त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी दिली. त्यानंतर ‘एमएमआरडीए’चे अधिकारी व पथकाला कारवाई न करताच परतावे लागले.

सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच, त्यांच्या गोदामावर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासन कामाला लागते, ही आश्चर्याची बाब आहे. अशा पद्धतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत.

- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

(शरदचंद्र पवार) पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT