MMRDA will lease out plots worth crores in BKC mumbai sakal
मुंबई

Mumbai : एमएमआरडीए बीकेसीतील कोट्यवधीचे भूखंड भाडेतत्त्वावर देणार

तब्बल ८० वर्षांसाठी हे २ भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई प्रदेश महानगर प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने आखलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलातील आपल्या ताब्यात सुमारे १४ हजार चौरस फुटाचे भूखंड खासगी व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल ८० वर्षांसाठी हे २ भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार आहे.

या भूखंडाच्या विक्रीतून २ हजार ९२८ कोटी इतकी रक्कम एमएमआरडीएला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई आणि परिसरात एमएमआरडीएने गेल्या काही वर्षात मोठं मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावे आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी पुरेसा निधी उभारण्यावर भर आहे.

त्यामुळे बिकेसीतील सुमारे १५ चौरस फूट जागा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. बिकेसीतील ई आणि जी ब्लॉकमधील जमीन एमएमआरडीएच्या मालकीची आहे. या दोन ब्लॉकमध्ये मिळून वाणिज्य वापराचे ११३ भूखंड, रहिवासी वापराचे ३४ भूखंड, सामाजिक सुविधांसाठीचे २० भूखंड आहेत.

एमएमआरडीएने बीकेसीतील सी १३ आणि सी १९ डी या २ व्यावसायिक वापराच्या भूखंडाना भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सी १३ भूखंड ७ हजार ७१ चौरस मीटरचा असून ४५ हजार क्षेत्रावर बांधकाम करण्याची परवानगी आहे. सी १३ साठी १५५० हजार कोटी इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तर सी १९ साठी १३७८ कोटी इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. याहून अधिक बोली लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याच्या पुढे सी १९ भूखंड ६ हजार ९६ चौरस मीटरचा असून ४० हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाचा आहे. या दोन्ही भूखंडांसाठी प्रत्येकी चौरस मीटरसाठी ३ लाख ४४ हजार ५०० राखीव किंमत ठरविण्यात आली आहे. यातून अंदाजे २ हजार ९२८ कोटी रुपयांची रक्कम मिळेल. तरी इच्छुक कंपन्यांना १७ जुलैपर्यंत टेंडर सादर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT