MNS Agitation at mumbai shanmukhananda hall for mumbai goa highway  
मुंबई

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था! मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

रोहित कणसे

मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनसेकडून या मुद्द्यावर आज आंदोलन करत आक्रमक भूमिका घेण्यात आली. अभियंता दिनानिमित्त विशेष कार्यक्रामाचे आयोजन करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा आज सरकारकडून सत्कार करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात मनसेने जोरदार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी मनसेकडून काही दिवसांपासून केली जात आहे. आजही मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाबेर मनसेने आंदोलन केलं. जर कामंच झालेलं नाही तर तुम्ही यांचे सत्कार कसले करता? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई गोवा महामार्गावरच्या एकाच लेनचे काम झाले आहे मात्र त्यावरही खड्डे पडले आहेत असा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी केले. साम टीव्हीने यासंबंधिचे वृ्त्त दिले आहे.

दरम्यान या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधतही घोषणाबाजी केली. तसेच त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले. पोलिसांनी संदीप देशपांडे यांना तसेच अन्य सर्व कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT