raj thackeray 
मुंबई

Raj Thackeray: राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्त्यावर उतरुन मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केलीय. राज ठाकरे आज पनवेलमध्ये आले होते. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन राज ठाकरे आक्रमक झाले असून या आंदोलनाला आज त्यांनी हिरवा कंदील दाखवला. राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरुन मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन मनसे आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. (mns chief raj Thackeray in panvel saw road condition of mumbai goa highway)

मुंबई-गोवा रस्त्यावरील खड्ड्यांबाबत लोकांमध्ये असंतोष आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याची पाहायला मिळतंय. या मुद्द्यावरुन मनसेने आंदोलनाचे हत्त्यार उचललं आहे. राज ठाकरे यांनी आज पनवेलमध्ये मेळावा घेत सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला. सरकारचं काम लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. तसेच तेथील लोकांशी चर्चा केली.

राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रातील रस्त्याच्या दुरावस्थेविषयी भाष्य केलं. कोकणातील रस्त्यांची भीषण अवस्था झाली आहे. सत्ताधारी पक्ष काय करतोय माहिती नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. भाजपने जरा या रस्त्यांकडे लक्ष द्यावे. आमदार फोडण्यापेक्षा पक्ष निर्माणावर भर द्यावा. वारंवार रस्त्याचे काम न होऊनही लोक त्यांनाच निवडून देत आहेत. लोकांचं काय चाललंय हे मला कळत नाही. मला एकदा संधी देऊन पाहा. चित्र बदललेलं असेल, असं ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गावरुन देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांना मी बोललो आहे. मुख्यमंत्री म्हणतात महामार्ग पूर्ण होईल. पण मृत्यूमुखी पडलेल्यां लोकांचं काय. अडीच हजार लोक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबई-गोवा महामर्गावर आतापर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झाले. पण रस्ता झाला नाही. रस्त्याचे काम होत नसताना परत परत त्याच पक्षांना का निवडून दिलं जातं, असा प्रश्न राज यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT