नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे  
मुंबई

गजानन काळेंचा जामीन फेटाळाला, पत्नीची कृष्णकुंजवर धाव

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांना मोठा झटका बसला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जीवाला धोका असल्यामुळे जामीन अर्ज फेटाळावा अशी साक्ष संजिवनी काळे यांनी कोर्टात दिली. त्यानंतर कोर्टाने गजानन काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला. मागील दहा दिवसांपासून गजानन काळे फरार आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने मानसिक, जातीवाचक शिवीगाळ व शारीरिक छळ करत असल्याची तक्रार केली होती.

गजानन काळे यांच्या पत्नी संजिवनी काळे यांनी न्यायासाठी कृष्णकुंजवर धाव घेतली आहे. गजानन काळे यांना अटक करण्यात यावी, यासाठी राज ठाकरे यांची संजिवनी काळे यांनी भेट घेतली आहे. गजानन काळे यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात संजिवनी काळे या राज ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहेत. परंतु, राज ठाकरे हे सध्या पुण्यात आहेत. त्यामुळे संजीवनी काळे आपले गाऱ्हाणे शर्मिला ठाकरे यांच्याकडे मांडले. तसेच या सगळ्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून गजानन काळेंवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मानसिक व शारीरिक छळ (mental and physical harassment) करण्यात येत असल्याची तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत असल्याची तक्रार गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने केली. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी (nerul police) गजानन काळे यांच्या विरोधात छळवणुकीसह इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला. मागील काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याची तक्रार गजानन काळे यांच्या पत्नीने केली आहे. गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचेही त्याच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 2008 मध्ये लग्न झाल्यानंतर 15 दिवसांतच गजाननने किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून सावळा रंग व जातीवरून आपल्याला टोमणे मारून जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तसेच गजानन याने आपल्याला मारहाण केल्याचे देखील त्याच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT